Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरमध्ये 7 दिवसात दोनदा गोळीबार, बापाकडून मुलीवर अत्याचाराचीही घटना
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
छत्रपती संभाजी नगरमध्ये या आठवड्यात दोन वेळा गोळीबार झालाय तर एका घटनेमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण करण्यात आली.
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट : छत्रपती संभाजी नगरमध्ये या आठवड्यात दोन वेळा गोळीबार झालाय तर एका घटनेमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच मारहाण करण्यात आली. याशिवाय दिवसाढवळ्या ज्वेलर्सच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडलीय. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे स्वतःच्याच वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
संभाजीनगर मध्ये भर दिवसा घरात घुसून गोळीबार
छत्रपती संभाजी नगर शहरातील पुंडलिक नगर परिसरामध्ये भर दिवसा एका मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या घरात घुसून दोन अज्ञातांनी दोन गोळ्या झाडल्या यामध्ये त्यांनी समय सूचकता दाखवत मान बाजूला केली म्हणून त्यांचे थोडक्यात प्राण वाचले. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बारा तासाच्या आत आरोपीला अटक करून या प्रकरणाचा छडा लावला होता. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या पहिल्या बायकोच्या मुलानेच बापाला मारून अनुकंपा नुसार नोकरी मिळावी म्हणून हा गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
advertisement
बापानेच केला 13 मुलीवर बलात्कार, मुलगी पाच महिन्यांची गर्भवती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आलीय. 13 वर्षीय मुलीच्या सावत्र वडिलांनीच तिच्यावर मागील वर्षभरापासून अत्याचार केले आहे. धक्कादायक म्हणजे यातून पीडित मुलगी ही पाच महिन्यांची गर्भवती देखील झाली आहे. याप्रकरणी पीडित मुलगी घाबरून फिर्याद देत नव्हती. मात्र पिडीतेच्या आजोबांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस नराधम बापाला ताब्यात घेतले आहे.
advertisement
डॉक्टरांच्या मदतीला गेलेल्या पोलिसांना बेल्टने मारहाण
शहरातील शरद टी पॉइंट येथील एम्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांना एक जण बेल्टने मारहाण करीत होता. डॉक्टरांच्या मारहाणीची तक्रार सिडको पोलिसांच्या ११२ वर आल्यानंतर दोन पोलिस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्यात गाडी लावलेल्या व्यक्तीस मारहाणीविषयी चौकशी करीत असतानाच तिघांनी मिळून एका पोलिस कर्मचाऱ्यास पकडून बेल्टने मारहाण केली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणी दुसरा गुन्हा या आरोपींवर दाखल करण्यात आला त्यानुसार पोलिसांनी या तीनही आरोपीला अटक केलेली आहे. आत्ताच्या माहितीनुसार हे तीनही आरोपी हरसुल कारागृहात आहेत.
advertisement
आई-वडिलांना शिवीगाळ केल्याने गोळी झाडून केला एकाचा खात्मा
बयाजीपुरा येथे 9 ऑगस्ट रोजी रात्री फय्याज पठाणने अंदाधुंद गोळीबार करत हमद चाऊस याचा खून केला होता. उसने घेतलेले पैसे देण्यास उशीर होत असल्याने हमदने फय्याजसमोर त्याच्या घरी आई-वडिलांना शिवीगाळ केली होती, तेव्हा फयाज हमदला म्हणाला होता, 'अभी तू इधर से निकल जा तुझे जो भी बताऊंगा भरे चौक मे बताऊंगा' त्यानंतर गावठी कट्ट्याने हमदला गोळ्या घातल्या पोलिसांनी मध्यरात्री 2 वाजता जहागीर कॉलनी झटवाडा येथून अटक केल्यावर तो म्हणाला की, "मी जे म्हणालो ते करून दाखवले" यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान, हमद चाऊसच्या समर्थकांनी दहा ऑगस्टला बायजीपुरा बंदची हाक दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेने संपूर्ण शहर हदरून गेले होते, कारण शहरात चार दिवसाच्या नंतर हा दुसरा गोळीबार होता. यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.
advertisement
ज्वेलर्स दुकानात दिवसाढवळ्या दरोडा, शस्त्राचा धाक दाखवून दुकान लुटले
वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील मंगलमूर्ती ज्वेलर्स दुकानात चोरट्याने शस्त्राचा धाक दाखवून सराफा दुकान लुटल्याची घटना घडलीय. तीन चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्स मधील मौल्यवान दागिने घेऊन चोरटे पसार झाली आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी तसेच उद्योजक वर्गात मोठे भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला होता. त्यानंतर संपूर्ण सीसीटीव्ही च्या आधारे पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत मात्र दिवसाढवळ्या झालेल्या या दरोड्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
August 13, 2023 9:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chhatrapati Sambhajinagar : छ. संभाजीनगरमध्ये 7 दिवसात दोनदा गोळीबार, बापाकडून मुलीवर अत्याचाराचीही घटना