Chhatrapati Sambhajinagar : दारु प्यायले, मोबाईल शॉपी फोडली; चोरीचा व्हिडीओ पालकांनी पाहिला, दोघांनाही थेट...

Last Updated:

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो चोरी करणाऱ्यांच्या कुटुंबियांनीच पाहिला. त्यानंतर त्यांनी स्वत:च आपल्या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

News18
News18
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट : छत्रपती संभाजीनगर इथं दोन आठवड्यापुर्वी झालेल्या मोबाईल शॉपी चोरी प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो चोरी करणाऱ्यांच्या कुटुंबियांनीच पाहिला. त्यानंतर त्यांनी स्वत:च आपल्या मुलांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दोन मित्रांनी दारू प्यायल्यानंतर जालन्याहून छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. त्याच नशेत दोघांनी मोबाईलचे दुकान फोडले. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झाले होते. जेव्हा त्या दोघांच्या घरी पोहोचले तेव्हा आपल्याच मुलांचा चोरी करत असलेला व्हिडीओ पाहून त्यांना धक्काच बसला.
advertisement
चोरी करणाऱ्या मुलांच्या पालकांनी त्यांना घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले. त्या दोघांची नावे अभिषेक राजू रिढे आणि आदित्य अनिल उघडे अशी असल्याचं समोर आलं आहे. दोघांपैकी एक जण आयटीआयचा तर दुसरा फार्मसीचा विद्यार्थी आहे. दोघांच्या पालकांनी सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासमोर दोघांनाही हजर केलं.
view comments
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
Chhatrapati Sambhajinagar : दारु प्यायले, मोबाईल शॉपी फोडली; चोरीचा व्हिडीओ पालकांनी पाहिला, दोघांनाही थेट...
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement