मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीत कैलास स्वामी नावाचा तरूण विवाहित महिलेला घरात घुसून त्रास द्यायचा. या घटनेची माहिती कुटुंबियांना कळताच बापलेकाने मिळून तरूणाला गंभीर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीमध्ये युवकाचा मृत्यू झाला आहे.कैलास गणेश स्वामी असे मयत युवकाचे नाव असून तो कुरुंदा गावातील रहिवासी आहे.वसमत तालुक्यातील डोणवाडा गावात काल सायंकाळी ही घटना घडली आहे.
advertisement
बापलेक बालाजी तमेवार व होनाजी तमेवार यांनी घरात येऊन त्रास देणाऱ्या या कैलास स्वामीला गंभीर मारहाण केली होती. या मारहाणीत तरूणाची दुचाकी देखील जाळून टाकली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपी बापलेक बालाजी तमेवार व होनाजी तमेवार यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी अटक देखील केली आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.
advertisement
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
Jan 31, 2026 9:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Hingoli News : घरात घुसून विवाहितेला त्रास द्यायचा, नवऱ्याला कळताच भयंकर घडलं,अख्खं गाव हादरलं
