माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंदडा यांनी मुंबईमध्ये शिवसेनेते प्रवेश केला. हिंगोलीचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, वसमतचे तालुकाप्रमुख राजू चापके, ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांची देखील यावेळी उपस्थिती होती. शिवसेना ठाकरे गटाने हिंगोली लोकसभेचे तिकीट नाकारल्यापासून माजी मंत्री मुंदडा हे पक्षावर नाराज होते. अखेर या नाराजीतून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यावेळी अनेक बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. मात्र मुंदडा यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याची भूमिका घेतली. ते लोकसभेसाठी इच्छूक होते, मात्र तिकीट न मिळाल्यानं नाराज झालेल्या जयप्रकाश मुंदडा यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे.
