घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भावजय अगोदर आंघोळीला जात आहे, म्हणून नणंदेला राग आला. त्यानंतर तिने तिच्या अंगावर धुण्याचं पाणी टाकलं. यावरून वाद सुरू झाला. या वादात नंतर सासू-सासरेही उतरले. सासू -सासऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप सुनेनं केला आहे.
दरम्यान या प्रकरणात आता सुनेच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात नणंद व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
December 15, 2023 9:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli News : सुनेच्या अंगावर पाणी फेकलं; सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल
