वाचा - तुळजा भवानीची सिंहासन पूजा, भाविकांना या तारखेदरम्यानच करता येणार online नोंदणी
भाविकावर काळाचा घाला
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोंडाळा येथील पंढरपूरला गेलेल्या 60 वर्षीय वारकऱ्याचा गावी परत येताना एसटी बसमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामराव रहाटे असं या मयत वारकऱ्याचे नाव आहे. ते आषाढी वारीसाठी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला गेले होते. परंतु, त्यांची तब्येत बिघडल्याने आज ते एका सहकाऱ्यासह एसटी बसने गावाकडे परत निघाले होते. दरम्यान आज सायंकाळी एसटी बस सेनगावला पोचण्यापुर्वी त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता आणि प्रवासातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गोंडाळा गावावर शोककळा पसरली आहे.
advertisement
Location :
Hingoli,Maharashtra
First Published :
July 17, 2024 11:36 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Ashadhi Wari : पंढरपूरहून घरी परतणाऱ्या वारकऱ्यावर काळाचा घाला; हिंगोलीच्या आजोबांनी एसटीत सोडला जीव