घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना हिंगोलीतल्या कळमनुरीमध्ये घडली आहे. कुपटी गावचे माजी सरपंच विजय नरवाडे यांच्यावर कोयत्यानं तीन जणांनी हल्ला केला. विशेष म्हणजे ही घटना कळमनुरी तहसील कार्यालयासमोर घडली आहे. या हल्ल्यात विजय नरवाडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनं खळबळ उडाली आहे.
advertisement
जुन्या वादातून हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार विजय नरवाडे यांच्यावर जमिनीच्या जुन्या वादातून तिघांनी कोयत्यानं हल्ला केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतल आहे, तर एक हल्लेखोर फरार झाला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
Location :
Hingoli,Hingoli,Maharashtra
First Published :
May 18, 2024 9:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Hingoli News : माजी सरपंचावर तहसील कार्यालयासमोरच कोयत्यानं सपासप वार; घटनेनं हिंगोलीत खळबळ