याबाबत मिळालेली माहिती अशी की, पप्पू चव्हाण हे जिल्हा परिषदेत कामानिमित्त आले होते. दुपारी तीनच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या आवारात ते आले असताना दोघे जण त्यांच्या दिशेने आले. काही कळायच्या आतच त्यांच्या दिशेने हल्लेखोरांनी गोळीबार केला. यावेळी पप्पू चव्हाण खाली वाकल्याने त्यांच्या पाठीत दोन गोळ्या घुसल्या. तर दोन गोळ्या घटनास्थळी पडल्या.
advertisement
स्कूल बसची सायकलला धडक, भीषण अपघातात बहिणीचा मृत्यू तर भाऊ जखमी
अचानक घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फूटेजच्या सहाय्याने पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर रुग्णालयासमोर पप्पू चव्हाण समर्थकांनी गर्दी केली आहे.
पप्पू चव्हाण यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. भाजप पदाधिकारीसुद्धा त्याठिकाणी दाखल झाले आहेत. तर पोलीसांनी सुरक्षेच्या कारणास्तव फौजफाटा तैनात केला आहे.
