पुढे बोलताना ते म्हणाले की, 'समाजाची खदखद आहे, म्हणून ते आंदोलनात सहभागी होत आहेत. लोकांचा हा आक्रोश आहे, ही भावना सरकारने समजून घ्यावी.' दरम्यान त्यांनी यावेळी बोलताना छगन भुजबळ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 'हाकेंना विरोधक मानत नाही, सगळा कर्ता करविते भुजबळ हे आहेत. छगन भुजबळ जे करतायत ते सामान्य लोकांना चांगलं वाटत नाही, आमच्या नोंदी सापडलेल्या असताना नाही म्हणणं, मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असताना आपला नेता मराठ्यांना का आरक्षण द्यायचं नाही म्हणतो असं सामान्य ओबीसी लोकांना वाटतं? म्हणून ओबीसी देखील आंदोलनात सहभागी होत आहेत,' असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
'कुणबी मराठा एकच आहे, त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याची पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे. ओबीसींच्याच नाही तर मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना देखील पाडा, मराठ्यांना त्रास व्हायला नको. आमची कोणतीही मागणी बदललेली नाही. भुजबळ यांनी 10-20 लोक हाताशी धरले आणि त्यांना ते बोलायला लावत आहेत' असंही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.