TRENDING:

धक्कादायक! स्मशानभूमीत जायला रस्ता नाही; गावातील चौकातच केला अंत्यविधी

Last Updated:

जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे.  स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने गावातील चौकातच अंत्यविधी करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंगोली, 30 जुलै, मनिष खरात : जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे.  स्मशानभूमीत जायला रस्ता नसल्याने गावातील चौकातच अंत्यविधी करण्यात आला आहे. औंढा नागनाथ तालुक्याच्या येडूद या गावामधील ही घटना आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे जायला रस्ता नव्हता. मृताच्या कुटुंबानं हे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली, प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचं कामही सुरू झालं, मात्र त्याला उशिर होणार असल्यानं अखेर गावातील चौकातच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
गावातच केले वृद्धावर अंत्यसंस्कार
गावातच केले वृद्धावर अंत्यसंस्कार
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  औंढा नागनाथ तालुक्याच्या येडूद गावातील आनंदा पऊळकर या 70 वर्षीय वृद्धाचा काल मृत्यू झाला. परंतु  स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे जाण्यासाठी रस्ताच नव्हता. त्यामुळे अंत्यविधीचा खोळंबा झाला होता. हा रस्ता प्रशासनाने मोकळा करावा, नसता तहसील कार्यालयात अंत्यविधी करण्याचा इशारा मृतांच्या कुटुंबानं आणि रिपब्लिकन सेना या संघटनेच्या वतीनं देण्यात आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

कुटुंबाच्या इशाऱ्यानंतर आज सकाळी प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू झालं. परंतु अंत्यविधीला खूप वेळ होत असल्याने व रस्ता व्हायला बराच वेळ जात असल्याने अखेर हा अंत्यविधी गावातील चौकातच करण्यात आला. यावेळी गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
धक्कादायक! स्मशानभूमीत जायला रस्ता नाही; गावातील चौकातच केला अंत्यविधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल