TRENDING:

Accident : हिंगोलीत भीषण अपघात, भरधाव टेंपोने चिरडल्याने 4 भाविक ठार, 5 जण गंभीर

Last Updated:

हिंगोलीत पायी चालत जाणाऱ्या भाविकांना भरधाव वेगातील एका पिकअप टेम्पोने चिरडले. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मनिष खरात, हिंगोली : हिंगोलीच्या वाशिमकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर माळहिवरा फाटानजीक पायी चालत जाणाऱ्या भाविकांना भरधाव वेगातील एका पिकअप टेम्पोने चिरडले आहे. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चौघेजण जागीच ठार झाले आहेत तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
News18
News18
advertisement

याबाबत मिळालेली माहिती अशी की,सर्व भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम व जोडतळा येथील रहिवासी आहेत. आज शनिवारनिमित्त हे भाविक माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी चालत जात होते. दरम्यान महामार्गावर पोहोचल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोने या भाविकांना धडक दिली. घटनास्थळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे पोलीस कर्मचारी व नागरिकांनी पोचून जखमींना तात्काळ रुग्णालयात पाठवले. जखमींवर हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

Shocking! उन्हापासून वाचण्यासाठी महिलेने डोक्याला बांधला स्कार्फ, धडावेगळं झालं डोकं

अहमदाबादहून पुण्याला येणाऱ्या बसचा भीषण अपघात

अहमदाबाद बडोदा एक्सप्रेस वेवर प्रवासी बसचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर असलेल्या रेलिंगला तोडून बस २५ फूट खाली कोसळली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. बसमधून २० पेक्षा जास्त जण प्रवास करत होते. बस अहमदाबादहून पुण्याच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीची खरेदी बाकीये? खरेदी करा वस्तू, पुण्यात इथं भरलंय प्रदर्शन, Video
सर्व पहा

याबाबबत मिळालेली माहिती अशी की, अहमदाबादहून पुण्याला बस निघाली होती. या बसमध्ये २३ प्रवासी होते. सीमेंट टँकर ड्रायव्हरने अचानक गाडी वळवली. यामुळे बसला टँकर धडकला. यानंतर बस रस्त्याच्या कडेचे रेलिंग तोडून २५ फूट खाली कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. बेदरकारपणे वाहन चालवणे आणि अपघाताला कारणीभूत ठरल्या प्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
Accident : हिंगोलीत भीषण अपघात, भरधाव टेंपोने चिरडल्याने 4 भाविक ठार, 5 जण गंभीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल