TRENDING:

रात्री घरी न जाता एसटीच्या विश्राम गृहातच झोपला; सकाळी मृतदेह आढळला, चालकाच्या मृत्यूनं हिंगोली हादरलं

Last Updated:

हिंगोलीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिंगोली, 6 ऑक्टोबर, मनीष खरात : हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हिंगोली बसस्थानक परिसरात चालकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. सुरेश सलामे असं या चालकाचं नावं आहे. ते रात्री उशिरा शहरात लातूर-हिंगोली बस घेऊन आले होते. उशिर झाल्याने घरी न जाता सलामे हे आगारातील विश्रामगृहातच झोपले होते. मात्र सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
News18
News18
advertisement

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली एसटी बसस्थानक परिसरात चालकांसाठी असलेल्या विश्रामगृहात सुरेश सलामे या एसटी चालकाचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे. सुरेश सलामे हे रात्री उशिरा लातूर-हिंगोली बस घेऊन हिंगोली बसस्थानकात आले होते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ॲक्शन मोडवर, वर्षभराचा प्लॅन तयार, काय करणार?
सर्व पहा

परंतु रात्री उशिर झाल्यानं ते घरी न जाता आगारातील विश्रामगृहातच झोपले. मात्र आज सकाळी ते मृतावस्थेमध्ये आढळून आले आहेत. त्यांचा मृत्यू  नेमका कशाने झाला? हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/हिंगोली/
रात्री घरी न जाता एसटीच्या विश्राम गृहातच झोपला; सकाळी मृतदेह आढळला, चालकाच्या मृत्यूनं हिंगोली हादरलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल