जळगाव : आज बारावीचा निकाल जाहीर झाला. परीक्षेत अपयश आल्यावर त्याला सामोरे जाण्याऐवजी चुकीचे पाऊल उचलतात, अशीच एक दुर्दैवी घटना जळगावात घडली आहे. बारावीच्याा परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर पाचोरा येथे एका १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
जळगावातील पाचोरा तालुक्यातील देशमुख वाडी येथे घडली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव भावेश प्रकाश महाजन असे आहे. भावेश आपल्या बहिणीकडे देशमुखवाडी येथे काही दिवसांपासून राहायला आला होता.त्याने जळगावच्या एरंडोल येथे विद्यालयात बारावीची परीक्षा दिलेली होती. त्यानंतर सुट्या लागल्यानंतर तो बहिणीकडे आला होता. मात्र आज नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात त्याला फक्त 42% मिळाल्यामुळे तो मानसिक तणावात होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
घरातच गळफास लावून आत्महत्या
भावेश घरात एकटाच होता. घरातील कुणीच नसताना त्याने दोराच्या साहाय्याने घरातच गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने बहीण घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तात्काळ पाचोरा गावातील नागरिकांना आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
खचून जाऊ नका, आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही
बारावीच्या परीक्षेत कमी गुण किंवा अपयश मिळाल्यानंतर विद्यार्थी खचून जातात. खरं तर आयुष्यात यश आणि अपयश येतंच पण त्यामुळे खचून जाऊ नका. कारण आयुष्यात स्वताला सिध्द करण्याची संधी तुम्हाला दुसऱ्यांदा मिळते. पण आयुष्य दुसऱ्यांदा मिळत नाही. 19 वर्षाच्या भावेशनं ऐन उमेदीच्या काळात आयुष्य संपवलं.
बारावीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) 2025 च्या बारावी (HSC)चा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनी बाजी मारली असून कोकण विभाग अव्वल स्थानी आहे. बारावीच्या परीक्षा जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी जिली होती. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 89.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, 94.58 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.