TRENDING:

Chocolate: 'मुलगा मागे लागला म्हणून चॉकलेट दिलं, आरोहीनं गिळलं अन् 5 मिनिटांत संपलं', चुलता ढसाढसा रडला

Last Updated:

लहान मुलांना चॉकलेट आपण नेहमी देतच असतो. पण बीडमध्ये एका ७ महिन्याच्या आरोही खाडे या चिमुरडीचा चॉकलेट घश्यात अडकल्यामुळे मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बीड : 'आम्ही गावावरून आलो होतो. मुलगा मागे लागला होता म्हणून त्याला स्टॉब्रेरी चॉकलेट घेऊन दिली होती, त्याने खाल्ली. तेव्हा घरात आमची ७ महिन्यांची आरोही खेळत होती, तिच्यासोबत रॅपरसह चॉकलेट टाकलं. तिने ते खेळता खेळता तोंडात टाकलं हे पाहून आम्ही तिच्या तोंडातून चॉकलेट काढायला गेलो तेव्हा रॅपर हातात आलं अन ५ मिनिटात सगळं संपलं' हे सांगताना मृत आरोहीच्या चुलत्याला अश्रू अनावर झाले.
(बीडमधील घटना, AI फोटो)
(बीडमधील घटना, AI फोटो)
advertisement

लहान मुलांना चॉकलेट आपण नेहमी देतच असतो. पण बीडमध्ये एका ७ महिन्याच्या आरोही खाडे या चिमुरडीचा चॉकलेट गळ्यात अडकल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  बीड तालुक्यातील काटवटवाडी गावात ही घटना घडली. या गावात राहणारे आनंद खोड यांच्याा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा चुलते अमोल खाडे हे तिथेच होते. त्यांनी आपल्या मुलासाठी चॉकलेट आणलं होतं. पण, त्या एक रुपयाच्या चॉकलेटमुळे आरोहीचा मृत्यू होईल, असं घरात कुणाला वाटलं नव्हतं.

advertisement

मुलगा मागे लागला म्हणून चॉकलेट आणलं

बुधवारी संध्याकाळी ५ वाजता ही घटना घडली. आम्ही नुकतंच गावातून आलो होतो. सगळे घरात बसलेले होतो. मी बाहेर चाललो होतो, तर मुलगा मागे लागला होता. त्यामुळे त्याला चॉकलेट घेऊन दिलं होतं. मी माझ्या २ वर्षांच्या मुलासाठी चॉकलेट आणलं होतं. तो मागे लागला होता. त्यामुळे त्याला चॉकलेट घेऊन दिलं होतं. त्याने चॉकलेट खाल्लं. त्यावेळी आरोही ही घरात खेळत होती. तिच्यासमोर रॅपरसह चॉकलेट खाली टाकलं. तिने ते तोंडात घातलं, असं अमोल खाडे यांनी सांगितलं.

advertisement

हातात रॅपर आलं

आरोहीने चॉकलेट गिळलं तेव्हा मी, घरात माझी आई होती, पत्नी होती, भाऊजाई होती. आम्ही लगेच तिच्या तोंडातून चॉकलेट काढण्याचा प्रयत्न केला. पण, चॉकलेट बाहेर काढत असताना हातात रॅपर आलं.  पण हे सगळं ५ मिनिटामध्ये झालं.  आम्ही आरोहीला घेऊन अनेक दवाखान्यात घेऊन गेलो होतो, पण एकही डॉक्टर जागेवर नव्हता. आमच्या गावापासून बीड शहर फक्त १५ किमी अंतरावर आहे. आम्ही १० मिनिटांमध्ये बीड शहरात पोहोचलो होतो. शेवटी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलो, तेव्हा डॉक्टरांनी तपासून आरोहीला मृत घोषित केलं, असं सांगताना अमोल खाडे यांचे डोळे भरून आले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chocolate: 'मुलगा मागे लागला म्हणून चॉकलेट दिलं, आरोहीनं गिळलं अन् 5 मिनिटांत संपलं', चुलता ढसाढसा रडला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल