शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांच्या प्रतीक घुले धमकी दिल्याचा आरोप केला आहे. प्रतिक घुले हा बीड जिल्हा कारागृहात असून सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे. 'या आरोपींना पश्चाताप नसून पराक्रम केल्याची भावना आहे. आरोपी हा सुटून आल्यानंतर तुझं बघतो, अशी धमकी कर्मचाऱ्याला दिली आहे.
'या प्रकरणी कारागृह अधिक्षकांनी काही कारवाई करावी, जर कारागृह अधिक्षक यांनी कारवाई न केल्यास साडी चोळी भेट देऊ, असा इशाराच स्वप्निल गलधर यांनी दिला. तसंच, मकोकामधील आरोपींना दुसऱ्या कारागृहात पाठवण्याच्या आदेश असताना इथं का ठेवले जात आहे, असा सवालच उपस्थित केला. तसंच, कारागृहामध्ये वाल्मिक कराड मोबाईल वापरतो. मोबाईल रिचार्ज करतो, असा दावाही त्यांनी केला आहे.
advertisement
बीडचे कारागृह अधीक्षक काय म्हणाले?
या संपूर्ण प्रकरणात बीड जिल्हा कारागृहाचे कारागृह अधीक्षक राजाराम सिद्धलिंग चांदणे यांनी फोनवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की, 'कारागृहात गवते नावाचे कर्मचारी आहेत. त्यांनी अशी काही तक्रार दिलेली नाही. असा धमकीचा प्रकार घडला नाही, असा खुलासा चांदणे यांनी केला. तर कारागृहात सीसीटीव्ही आहेत त्यामुळे कुठलीच गोष्ट लपून राहणार नाही कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही चांदणे यांनी सांगितलं. पण, प्रत्यक्षात माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.
