१२ टक्के मतदारांचा थेट नकार
महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण ७ लाख ७१ हजार १३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी सुमारे १२ टक्के मतदारांनी थेट उमेदवारांना नाकारत नोटा पर्याय स्वीकारला. विशेष म्हणजे काही प्रभागांमध्ये नोटा मतांची संख्या इतकी जास्त होती की ती थेट पराभवाचे कारण ठरली. तब्बल १९ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाल्याने निसटता पराभव स्वीकारावा लागला. मतदारांच्या नाराजीचा हा कौल अनेक राजकीय गणिते बिघडवणारा ठरला आहे.
advertisement
विभागनिहाय नोटा मतदान
नोटा मतदानाचा प्रभाव शहरातील विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात दिसून आला. पंचवटी विभागात सर्वाधिक २०,५१२ मतदारांनी नोटा पर्याय निवडला. सिडको विभागात २०,६७१, नाशिक पश्चिम भागात ९,७८५, सातपूर विभागात ९,२६२ मतदारांनी नोटा दाबली. यावरून शहरातील मोठ्या लोकसंख्येचा सध्याच्या राजकीय पर्यायांवर विश्वास कमी होत असल्याचे चित्र स्पष्ट होते.
प्रभागांमध्ये नोटावर जोर
काही प्रभागांमध्ये नोटा मतदान विशेष लक्षवेधी ठरले. प्रभाग क्रमांक २५ मध्ये सर्वाधिक ४,७१५ नोटा मते नोंदवली गेली. प्रभाग १ मध्ये ३,७२९, प्रभाग २९ मध्ये ३,६०१, प्रभाग ५ मध्ये ३,५८६, तसेच प्रभाग ३ (नाशिक) मध्ये १२,९४३ नोटा मते पडली.
या आकडेवारीवरून स्थानिक पातळीवरील असंतोष, उमेदवार निवड प्रक्रियेवरील नाराजी आणि विकासाबाबतची मतदारांची अपेक्षा अधोरेखित होते.
नोटापेक्षा कमी मतांनी पराभूत झालेले उमेदवार
या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ११ प्रभागांमधील उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाल्याने पराभव पत्करावा लागला.
प्रभाग १ - गणेश चव्हाण
प्रभाग ८ क - कविता गायकवाड
प्रभाग ८ ड - प्रवीण पाटील
प्रभाग १० व - कलावती सांगळे
प्रभाग ११ अ - दीक्षा लोंढे
प्रभाग १२ व - वर्षा येवले
प्रभाग २५ ड - अनिल मटाले
प्रभाग २७ व - ज्योती कंवर
प्रभाग २८ व - शीतल भामरे
प्रभाग ३० ड - सागर देशमुख
प्रभाग ३१ क - पुष्पा पाटील
