TRENDING:

Indian Coast Guard Recruitment: भारतीय तटरक्षक दलामध्ये 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी, तुम्ही अर्ज केला का?

Last Updated:

Indian Coast Guard Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलामध्ये मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 630 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2025 आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतीय तटरक्षक दलामध्ये मोटर ट्रान्सपोर्ट आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 630 रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात आले असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून, ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भरती प्रक्रियेमध्ये मोटर ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर, मल्टी टास्किंग स्टाफमध्ये प्यून, पॅकर आणि ड्राफ्टी पदांसाठी नियुक्ती केली जाणार आहे.
News18
News18
advertisement

संपूर्ण भारतामध्ये भारतीय तटरक्षक दलाची ही नोकरभरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.cdac.in वर जाऊन अर्ज सादर करू शकतात. 630 पदांची ही नोकरभरती दोन विभागांमध्ये विभागली आहे. नाविक (जनरल ड्यूटी) 260, यांत्रिक (मॅकेनिकल) 30, यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 11, यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 19, नाविक (जनरल ड्यूटी) 260, नाविक (डॉमेस्टिक ब्रँच) 50 अशी जम्बो मेगाभरती केली जाणार आहे. मोटर व्हेहिकल ड्रायव्हर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, लास्कर पदांसाठी उमेदवारांचं कमाल वय 30 वर्षे असणं अनिवार्य आहे. याशिवाय, सरकारी नियमानुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.

advertisement

भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, उमेदवारांकडे मोटर ट्रान्सपोर्ट पदासाठी जड आणि कमी वजनाचे मोटर वाहनाचं वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्यांना ड्रायव्हिंग मोटर वाहन चालवण्याचा 2 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. इतर पदांवर सुद्धा भरती होण्यासाठी संबंधित क्षेत्रात 2 वर्षांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय, लास्कर फर्स्ट क्लास पदासाठी बोटीत 3 वर्षांची सर्व्हिस असणं आवश्यक आहे. भरतीसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार भरतीचं अधिकृत नोटिफिकेशनची PDF तपासू शकतात. सादर केलेल्या अर्जाची तपासणी आणि छाननी केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि लेखी परिक्षा आणि कौशल्य/ पदासंबंधीचे ज्ञान या परीक्षेसाठी बोलावले जाईल. शेवटी, लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल. त्या आधारावर निवड होईल.

advertisement

अर्ज कसा करावा?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत फुलांना सोन्याचं मोलं, शेवंती, झेंडू खायोत भाव, गुलाबाचा दर काय?
सर्व पहा

भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiancoastguard.cdac.in ला भेट द्या. वेबसाईटच्या होमपेजवर, लेटेस्ट नोटिफिकेशन सेक्शनवर क्लिक करा आणि नंतर 'भारतीय तटरक्षक भरती' लिंकवर क्लिक करा. पुढे, 'ग्रुप सी'ची जाहिरात PDF डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या. यानंतर, अचूक माहितीसह फॉर्म भरा आणि नंतर आवश्यक कागदपत्रे जोडा. सर्व फॉर्म भरल्यानंतर Commander, Coast Guard Region (A&N), Post Box No. 716, Haddo (PO), Port Blair - 744102, Andaman & Nicobar Islands या पत्त्यावर अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2025 आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indian Coast Guard Recruitment: भारतीय तटरक्षक दलामध्ये 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी, तुम्ही अर्ज केला का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल