फुलांचे वाढते दर
या वर्षी झेंडू, शेवंती आणि गुलाब या फुलांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कालपर्यंत 60 रुपयांना मिळणारा झेंडू आता 100 रुपये किलो दराने विकला जात आहे. तर शेवंती फुलांचा दर तब्बल 80 रुपये पाव किलो इतका झाला आहे. याशिवाय गुलाब पाकळ्यादेखील 100 रुपये पाव किलो दराने उपलब्ध आहेत.
advertisement
Diwali Rangoli Designs : फुलं-दिव्यांनी सजवा अंगण! दिवाळीत या खास रांगोळी डिझाईन नक्की ट्राय करा
हार, गजरे आणि तोरणांचे दर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हार आणि गजऱ्यांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. झेंडूचे मध्यम हार 150 रुपये, तर मोठे हार 200 रुपये दराने विकले जात आहेत. साधे हार सुमारे 120 रुपये, आणि गजरा एका हाताला 100 रुपये दराने मिळतोय. घर सजावटीसाठी लागणारे मोठे तोरण 70 रुपये मीटर, तर कोंबरा फुलं 10 रुपयांना विकली जात आहेत.
पूजेसाठी लागणारे साहित्य
दिवाळीच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दरही निश्चित झाले आहेत. कमळ फुलं 50 रुपयांना 3 आणि 60 रुपयांना 12 अशा दराने मिळतात. कडू कारळ, जे नरक चतुर्थीला फोडण्यासाठी वापरले जाते, ते 20 रुपयांना 4 मिळतात. भाताच्या लोंब्या 20 रुपयांना एक आणि 50 रुपयांना तीन या दरात उपलब्ध आहेत. तसेच झाडू 10 आणि 20 रुपयांना मिळत असून त्यांचीही मागणी वाढली आहे.
ग्राहकांची मोठी गर्दी
फुल मार्केटमध्ये दर वाढले असले तरीही ग्राहकांचा उत्साह मात्र ओसरण्याचं नाव घेत नाही. लोक आपल्या देवपूजेची आणि घर सजावटीची तयारी करत आहेत. संपूर्ण दादर परिसर फुलांच्या सुगंधाने आणि रंगीबेरंगी वातावरणाने नटला आहे.