पीएम किसानचा २१ वा हप्ता येणार! पण ही एक चूक केल्यास तुमचे पैसे थांबणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
PM Kisan Yojana 21 Installment : देशभरातील लाखो शेतकरी सध्या पीएम किसानच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
मुंबई : देशभरातील लाखो शेतकरी सध्या पीएम किसानच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपयांच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. आतापर्यंत सरकारने २० हप्त्यांचे वितरण पूर्ण केले असून, २१ वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात येण्याची शक्यता आहे.
२१ व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० ची रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने जमा केली जाणार आहे. या हप्त्यामुळे सणासुदीच्या खर्चात आणि रब्बी पिकांच्या तयारीत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल. मात्र, काही शेतकऱ्यांचे पैसे अद्याप थांबले असल्याचे आढळते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल नंबर, बँक खाते किंवा ई-केवायसी माहिती अपडेट नसणे आहे.
advertisement
मोबाईल नंबर व बँक तपशील अपडेट करणे आवश्यक
अनेकदा ओटीपी (OTP) न मिळाल्याने किंवा चुकीच्या माहितीमुळे पेमेंट प्रक्रियेत अडथळे येतात. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला मोबाईल नंबर आणि बँक खाते तपशील तपासणे अत्यावश्यक आहे.जर तुम्ही मोबाईल नंबर बदलला असेल, तर तो अपडेट करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर जा. नंतर “Farmers Corner” या विभागात “Update Mobile Number” या पर्यायावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक टाका, OTP व्हेरीफाय करा आणि नवीन मोबाईल नंबर सेव्ह करा. तसेच मोबाईल नंबर हा आधारशी लिंक केलेला असावा, अन्यथा OTP येणार नाही आणि प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
advertisement
लाभार्थी यादी कशी तपासाल?
शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी pmkisan.gov.in वर “Beneficiary Status” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक एंटर करा आणि सबमिट करा. त्यामुळे मागील हप्ते कधी मिळाले आणि पुढचा हप्ता केव्हा येईल, याची संपूर्ण माहिती मिळेल.
advertisement
ई-केवायसी करणे अनिवार्य
PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी संकेतस्थळावरील Farmers Corner विभागात जाऊन e-KYC लिंकवर क्लिक करा, तुमचा आधार क्रमांक टाका आणि OTP पडताळून ई-केवायसी पूर्ण करा.
फसव्या संदेशांपासून सावध रहा
view commentsसरकारने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, कारण केंद्र सरकार अशा प्रकारे माहिती विचारत नाही. अशा लिंक घोटाळ्यांचा भाग असू शकतात. कोणतीही अडचण आल्यास शेतकरी हेल्पलाइन क्रमांक १५५२६१ किंवा ०११-२४३००६०६ वर संपर्क साधू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 1:52 PM IST