Government Employee Salary Hike : दिवाळी धमाका! 'या' खात्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, कशी असेल वेतनश्रेणी?

Last Updated:

Government Employee Salary Hike :राज्यातील भूमी अभिलेख विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांसाठी यावर्षीची दिवाळी आनंदाची ठरणार आहे.

दिवाळीचा धमाका! 'या' खात्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, कशी असेल वेतनश्रेणी?
दिवाळीचा धमाका! 'या' खात्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, कशी असेल वेतनश्रेणी?
पुणे: राज्यातील भूमी अभिलेख विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांसाठी यावर्षीची दिवाळी आनंदाची ठरणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सुधारित वेतनश्रेणीस मान्यता देण्यासाठी भूमी अभिलेख संचालक व जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच ही वेतनश्रेणी लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भूकरमापकांना इतर विभागातील कर्मचाऱ्यांपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागत होते. या विषमतेविरोधात संघटनांनी अनेकदा आंदोलन, तक्रारी आणि बेमुदत संप सुरू केले होते. जुलै महिन्यात पुणे विभागातील भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या संपादरम्यान डॉ. दिवसे यांनी मध्यस्थी करत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर पुणे, नाशिक, कोकण, विदर्भ, छत्रपती संभाजीनगर या विभागातील विविध संघटना तसेच कास्ट्राईब भूमी अभिलेख संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्यापक बैठक घेण्यात आली. बैठकीला अतिरिक्त जमाबंदी आयुक्त ज्ञानेश्वर खिलारे, उपसंचालक राजेंद्र गोळे, कमलाकर हट्टेकर आदी अधिकारी उपस्थित होते.
advertisement

वेतनश्रेणीत मोठी वाढ

सध्याची भूकरमापकांची ‘एस-6’ वेतनश्रेणी बदलून ‘एस-8’ करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे बेसिक वेतन 19 हजारांवरून थेट 25 हजार 200 रुपयांपर्यंत वाढणार आहे. हा बदल महिनाभरात अंमलात येईल, असे संकेत बैठकीत देण्यात आले.
या निर्णयामुळे हजारो भूकरमापकांना दिलासा मिळणार असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारकडून तातडीने अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Government Employee Salary Hike : दिवाळी धमाका! 'या' खात्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, कशी असेल वेतनश्रेणी?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement