Thane Traffic : ठाणेकरांनो उद्याचा प्रवास जपून! दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त शहरातील वाहतूकीत बदल; कसे असतील मार्ग?

Last Updated:

Thane Traffic Update : ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त वाहन चालकांसाठी विशेष वाहतुक बदल लागू केले आहेत. जाणून घ्या कोणते मार्ग बंद राहतील आणि कोणते मार्ग वापरावेत.

News18
News18
ठाणे : ठाण्यात दरवर्षी दिवाळी निमित्ताने दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित केला जातो. राम मारूती रोड, मासुंदा तलाव परिसर, नौपाडा भागात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध पक्षांतील नेते तसेच चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित राहतात. एवढेच नाही तर ठाण्यातील विविध भागातून हजारो तरुण-तरुणी या कार्यक्रमात सहभागी होतात.
यावर्षीही 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ठाण्यात वाहतुक बदल लागू राहतील. या कालावधीत मासुंदा तलाव, राम मारूती रोड, गडकरी चौक, घंटाळी मंदिर चौक, गजानन महाराज चौक आणि आसपासच्या भागात गर्दी अपेक्षित आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतुक सुरळीत चालावी यासाठी ठाणे पोलिसांनी ठोस उपाययोजना केल्या आहेत.
वाहतुक बदल खालीलप्रमाणे आहेत:
1) डाॅ. मूस चौक – गडकरी चौक मार्ग: डाॅ. मूस चौकाजवळून गडकरी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. या मार्गावरून जाणारी वाहने टावरनाका व टेंभीनाका मार्गे वाहतुक करतील.
advertisement
2)गडकरी चौक – डाॅ. मूस चौक मार्ग: गडकरी चौकाजवळून डाॅ. मूस चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. याठिकाणी वाहने अल्मेडा चौक, गजानन महाराज चौक, तीन पेट्रोल पंप आणि हरिनिवास मार्गे वाहतुक करेल.
3)घंटाळी मंदिर चौक – पु. ना. गाडगीळ चौक मार्ग: घंटाळी मंदिर चौकाजवळून गाडगीळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. वाहने घंटाळी पथ मार्गे वाहतुक करतील.
advertisement
4)गजानन महाराज चौक – तीन पेट्रोल पंप मार्ग: या मार्गावरून गाडगीळ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना गजानन महाराज चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. वाहने तीन पेट्रोल पंप, हरिनिवास चौक मार्गे किंवा घंटाळी मंदिर मार्गे वाहतुक करतील.
5)राजमाता वडापाव सेंटर – गजानन महाराज चौक मार्ग: राजमाता वडापाव सेंटर दुकानाजवळून गजानन महाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल. याठिकाणी वाहने गोखले रोड मार्गे वाहतुक करु शकतील.
advertisement
ठाणे पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की हे मार्गदर्शन लक्षात घेऊन वाहन चालवावे. गर्दीच्या काळात सुरक्षित अंतर ठेवावे आणि वाहतुक नियमांचे पालन करावे. यामुळे दिवाळी पहाटचा आनंद आणि उत्सव सुरळीतपणे पार पडेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Thane Traffic : ठाणेकरांनो उद्याचा प्रवास जपून! दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त शहरातील वाहतूकीत बदल; कसे असतील मार्ग?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement