Metaचं मेसेंजर अॅप होणार बंद! वापरत असाल तर 15 डिसेंबरपूर्वीकरा हे काम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
मेटाने मेसेंजर डेस्कटॉप अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 डिसेंबरनंतर अॅपमध्ये लॉग इन करणे ब्लॉक केले जाईल. मेटाने यूझर्सना ते डिलीट करण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई : तुम्ही मेटाचे मेसेंजर डेस्कटॉप अॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कंपनीने 15 डिसेंबरपासून विंडोज आणि मॅकसाठी मेसेंजर अॅप बंद करण्याची घोषणा केली आहे. 15 डिसेंबरनंतर, यूझर आता लॉग इन करू शकणार नाहीत. एखाद्या यूझरने लॉग इन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना फेसबुकच्या वेबसाइटवर रिडायरेक्ट केले जाईल, जिथे ते त्यांचे संभाषण सुरू ठेवू शकतील.
लवकरच सुरु होईल प्रोसेस
मेसेंजरच्या हेल्प पेजनुसार, मेटा लवकरच अॅप बंद करण्याची प्रोसेस सुरू करेल आणि इन-अॅप अलर्टद्वारे यूझर्सना सूचित करेल. पृष्ठात असे म्हटले आहे की, तुम्ही मेसेंजर डेस्कटॉप अॅप वापरत असाल तर शटडाउन प्रोसेस सुरू होताच तुम्हाला एक अलर्ट मिळेल. 15 डिसेंबरनंतर, यूझर मेसेंजर अॅपमध्ये लॉग इन करू शकणार नाहीत. मेटाने यूझर्सना शटडाउननंतर अॅप डिलीट करण्याचे आवाहन केले, असे सांगून की 15 डिसेंबरनंतर ते निरुपयोगी होईल.
advertisement
वापरकर्त्यांना सूचित केले जात आहे
मेटाने शटडाउनपूर्वी यूझर्सना सूचित करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरून ते दुसऱ्या अॅक्सेस मेथडवर स्विच करू शकतील. विंडोज यूझर मेसेंजर बंद झाल्यानंतर फेसबुक डेस्कटॉप अॅप आणि फेसबुक वेबसाइटद्वारे मेसेजिंग सुरू ठेवू शकतील. त्याचप्रमाणे, मॅक यूझर्सना फेसबुक वेबसाइटद्वारे मेसेंजर वापरण्याचा ऑप्शन असेल.
advertisement
15 डिसेंबरपूर्वी हे करा
शटडाउनपूर्वी, मेटाने यूझर्सना सुरक्षित स्टोरेज चालू करण्याचा आणि त्यांची चॅट हिस्ट्री सेव्ह करण्यासाठी पिन सेट करण्याचा सल्ला दिला. जेव्हा यूझर फेसबुकच्या वेब व्हर्जनवरुन मेसेंजर अॅक्सेस करतील तेव्हा हे सर्व सपोर्डेड डिव्हाइसेसवर त्यांच्या चॅट्स ऑटोमॅटिकली सिंक करेल. मेटाने असेही स्पष्ट केले की जे फक्त मेसेंजर वापरतात ते फेसबुक अकाउंट तयार न करता मेसेंजर ऑनलाइन क्लायंटद्वारे लॉग इन करू शकतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 2:38 PM IST