सस्पेन्स, क्राईम आणि थरकाप उडवणारी कथा, ओटीटीवरील 'या' सीरिजपुढे Delhi Crime फेल

Last Updated:

OTT : प्राईम व्हिडीओवरील एका सीरिजपुढे 'दिल्ली क्राईम' आणि 'सर्च:द नैना मर्डर'देखील फेलं आहेत.

News18
News18
OTT Crime Thriller Web Series : ओटीटीवरच्या अशा वेब सीरिज लोकांना आवडतात ज्यात पुढे काय होणार? याची उत्सुकता निर्माण होत असते. लोकांना जाणून घ्यायचं असतं की गुन्हेगार असं का करतात, पोलिस कसे विचार करतात आणि गुन्हेगाराला कसं पकडतात. क्राईम थ्रिलर सिरीजमध्ये हाच अनुभव मिळतो, ज्यांची कथा प्रेक्षकांचं डोक सुन्न करणारी असते. यामुळेच ओटीटी लव्हर्सना सस्पेन्स, क्राईम आणि थरकाप उडवणाऱ्या कथा खूप आवडतात. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्हाला अशा अनेक जबरदस्त अ‍ॅक्शन थ्रिलर सिरीज पाहायला मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला मारामारी, गोळीबार आणि स्टंट सीनसुद्धा एकत्र पाहायला मिळतील. आपण ज्या सीरिजबद्दल बोलत आहोत, ती ॲमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे आणि तिचा तिसरा सिझन लवकरच येणार आहे.
प्राईम व्हिडिओवरील या लोकप्रिय सीरिजचं नाव आहे 'द फॅमिली मॅन'. ओटीटीवर अनेक हिंदी क्राईम थ्रिलर सीरिज उपलब्ध आहेत, पण या एकाच सिरीजबाबत लोकांमध्ये वेगळाच क्रेझ पाहायला मिळाली आहे. 'द फॅमिली मॅन' ही मनोज बाजपेयी यांच्या कारकिर्दीतील आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट सीरीजपैकी एक मानली जाते. आनंदाची गोष्ट म्हणजे लवकरच 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझनही रिलीज होणार आहे, जो 2025 च्या शेवटी पाहायला मिळेल. याचा पहिला सीझन 2019 मध्ये आणि दुसरा सीझन 2021 मध्ये आला होता. दोन्हीही सीझन हिट ठरले. याच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला IMDb वर 8 पेक्षा जास्त रेटिंग मिळालेली आहे.
advertisement
आतापर्यंत आलेत 2 सीझन!
'द फॅमिली मॅन 3' मध्ये मनोज बाजपेयी म्हणजेच श्रीकांत तिवारी यांचा जबरदस्त अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळाला होता. जरी 'दिल्ली क्राईम' आणि 'सर्च: द नैना मर्डर केस' या सीरीज अलीकडेच ओटीटीवर रिलीज झाल्या असल्या, तरी कथा बाजूने 'द फॅमिली मॅन'ला टक्कर देऊ शकल्या नाहीत. प्रेक्षक आता 'द फॅमिली मॅन सीझन 3' कडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत.'द फॅमिली मॅन' चे दिग्दर्शन राज आणि डीके यांनी केले आहे. या वेळी मनोज बाजपेयी यांच्या पात्राचा सामना जयदीप अहलावत यांच्याशी होणार आहे. शोमध्ये प्रियमणि श्रीकांत तिवारी यांच्या पत्नी सुचित्रा तिवारी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर शारिब हाश्मी हे श्रीकांतचे विश्वासू सहकारी जे.के. तलपडे यांच्या भूमिकेत झळकतील. अश्लेषा ठाकूर आणि वेदांत सिन्हा हे श्रीकांतची मुले, धृति आणि अथर्व यांच्या भूमिकांमध्ये आहेत.
advertisement
प्राईम व्हिडीओची जबरदस्त सीरिज!
'द फॅमिली मॅन' ही एक क्राईम थ्रिलर सीरीज आहे, ज्यामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील श्रीकांत तिवारी याची कथा दाखवण्यात आली आहे. तो देशाच्या गुप्तचर संस्थेत काम करतो आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी सांभाळतो. लोकांमध्ये 'द फॅमिली मॅन'बद्दलचा क्रेझ अजूनही टिकून आहे, कारण या वेब सीरीजची दमदार कथा, अभिनेत्यांची जबरदस्त अभिनयशैली आणि तगड्या विनोदामुळे प्रेक्षकांना ती खूपच आवडली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सस्पेन्स, क्राईम आणि थरकाप उडवणारी कथा, ओटीटीवरील 'या' सीरिजपुढे Delhi Crime फेल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement