TRENDING:

Indian Overseas Bank Bharti : इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 60 हजार ते 90 हजारापर्यंत मिळणार पगार

Last Updated:

Indian Overseas Bank Bharti : इंडियन ओव्हरसीज बँकेने नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत अनेक रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रियेला 12 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने (Indian Overseas Bank) नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत अनेक रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज प्रक्रियेला 12 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर पर्यंतची आहे. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत वेबसाइटला http://www.iob.in भेट द्यावी.
News18
News18
advertisement

शरीराच्या घामाला करू नका दुर्लक्ष, वेळीच घ्या अशी काळजी, तज्ज्ञांचा सल्ला

इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) स्पेशलिस्ट ऑफिसरच्या (SO) रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून 127 पदांची भरती केली जाणार आहे. भरतीसाठी उमेदवारांना iob.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. भरतीच्या माध्यमातून स्पेशलिस्ट ऑफिसरच्या अखत्यारित अनेक रिक्त पदे आहेत, त्यांची भरती केली जाणार आहे. जाहिरातीनुसाप प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्जदाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी बँकेने जारी केलेलं भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, जेणेकरून त्यामध्ये नमुद करण्यात आलेली शैक्षणिक पात्रता आणि अटींबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल.

advertisement

आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा आधार बनला परभणीचा तरुण, लाखो रूपयांची नोकरी सोडून करतोय समाजसेवा

महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडिशा, गुजरात, पश्चिम बंगाल आणि पंजाब हे नोकरीचे ठिकाण आहेत. भरती प्रक्रियेत, प्रवर्गानुसार अर्ज शुल्क देखील निश्चित करण्यात आले आहे. बँकेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये वयाची अट सुद्धा देण्यात आली आहे. जास्तीत जास्त 30 वर्षे असून कमीत कमी 20 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. SC आणि ST वर्गासाठी 5 वर्षांची सूट आहे, तर OBC वर्गासाठी 3 वर्षांची सूट आहे. खुला प्रवर्ग, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1,000 रुपये (जीएसटीसह) ठेवण्यात आलं आहे. तसेच, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्ती असलेल्या उमेदवारांसाठी केवळ 175 रुपये रुपये अर्जाचं शुल्क असणार आहे.

advertisement

IT मधील तरूणांना आता एसबीआयमध्ये काम करण्याची संधी, घसघशीत मिळणार पगार

दरम्यान, उमेदवारांकडून केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्जाचं शुल्क स्विकारलं जाईल.अर्ज भरण्याची प्रक्रिया, अर्ज शुल्क भरण्याची पद्धत आणि परीक्षेचे तिनही माध्यम ऑनलाईन असणार आहे. दरम्यान, एमएमजीएस- II (Middle Management Grade Scale II) या पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला 64,820 रुपये वेतन दिलं जाईल. त्यानंतर, अनुभव आणि प्रमोशनसह हा पगार 93,960 पर्यंत पोहोचू शकतो. एमएमजीएस- III (Middle Management Grade Scale III): या ग्रेडमध्ये कर्मचाऱ्यांना 85,920 इतकं सुरुवातीला वेतन मिळेल आणि कमाल वेतन 1,05,280 रुपये दिलं जाईल. याव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांना बँकेच्या नियमांनुसार भत्ते आणि इतर सुविधा देखील दिल्या जातील.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indian Overseas Bank Bharti : इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, 60 हजार ते 90 हजारापर्यंत मिळणार पगार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल