नवीन एलएचबी कोचने सुसज्ज असलेल्या ट्रेन 200 किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम आहेत. तसंच या ट्रेनचा सरासरी वेग 160 किमी प्रतीतास असणार आहे. जुन्या आयसीएफ कोचच्या ट्रेन या जास्तीत जास्त 140 किमी प्रती तासाच्या वेगाने धावतात, पण एलएचबी कोच लावल्यानंतर याच ट्रेन 200 किमी प्रती तासाच्या वेगाने धावणार आहेत, तसंच या ट्रेनचा सरासरी वेग 160 किमी प्रती तास असेल.
advertisement
गेल्या काही वर्षांपासून, भारतीय रेल्वे हळूहळू ICF कोच LHB कोचने बदलत आहे. जर्मनीमध्ये डिझाइन केलेले आणि भारतात उत्पादित केलेले, हे कोच स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहेत आणि त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे, त्यांची मागणी वाढत आहे आणि देशभरातील लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये त्यांचा वापर केला जात आहे.
महाराष्ट्रातल्या या 16 ट्रेनना एलएचबी कोच
ट्रेन क्रमांक 22157
सीएसएमटी – चेन्नई एक्सप्रेस
लागू तारीख : 14.01.2026
ट्रेन क्रमांक 22158
चेन्नई – सीएसएमटी एक्सप्रेस
लागू तारीख : 17.01.2026
ट्रेन क्रमांक 11088
पुणे – वेरावळ एक्सप्रेस
लागू तारीख : 15.01.2026
ट्रेन क्रमांक 11087
वेरावळ – पुणे एक्सप्रेस
लागू तारीख : 17.01.2026
ट्रेन क्रमांक 11090
पुणे – भगत की कोठी एक्सप्रेस
लागू तारीख : 18.01.2026
ट्रेन क्रमांक 11089
भगत की कोठी – पुणे एक्सप्रेस
लागू तारीख : 20.01.2026
ट्रेन क्रमांक 11092
पुणे – भुज एक्सप्रेस
लागू तारीख : 19.01.2026
ट्रेन क्रमांक 11091
भुज – पुणे एक्सप्रेस
लागू तारीख : 21.01.2026
ट्रेन क्रमांक 22186
पुणे – अहमदाबाद एक्सप्रेस
लागू तारीख : 21.01.2026
ट्रेन क्रमांक 22185
अहमदाबाद – पुणे एक्सप्रेस
लागू तारीख : 22.01.2026
ट्रेन क्रमांक 11404
कोल्हापूर – नागपूर एक्सप्रेस
लागू तारीख : 19.01.2026
ट्रेन क्रमांक 11403
नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस
लागू तारीख : 20.01.2026
ट्रेन क्रमांक 12147
कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस
लागू तारीख : 20.01.2026
ट्रेन क्रमांक 12148
हजरत निजामुद्दीन – कोल्हापूर एक्सप्रेस
लाभाची तारीख : 22.01.2026
रेल्वे क्रमांक 11050
कोल्हापूर – अहमदाबाद एक्सप्रेस
लाभाची तारीख : 24.01.2026
रेल्वे क्रमांक 11049
अहमदाबाद – कोल्हापूर एक्सप्रेस
लाभाची तारीख : 25.01.2026
एलएचबी कोचेस चांगले का?
एलएचबी कोचेस त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि वेगासाठी ओळखले जातात. एलएचबी कोचमध्ये क्लाइंबिंग अँटी-क्लाइंबिंग फीचर आहे, जे अपघात झाल्यास एका कोचेसला दुसऱ्या कोचेसवर आपटण्यापासून रोखते. शिवाय, अग्निरोधक साहित्य वापरलं गेल्यामुळे आगीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.
रेल्वेचं मिशन 2030
भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत सर्व आयसीएफ कोच टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या, देशातील बहुतेक प्रीमियम गाड्या, जसे की राजधानी, शताब्दी आणि दुरांतो, एलएचबी कोच चालवतात. भविष्यात, रेल्वे नेटवर्कवर एलएचबी कोचची संख्या आणखी वाढेल, ज्यामुळे देशभर प्रवास सुरक्षित, जलद आणि अधिक आरामदायी होईल.
