लोकल आणि टॅक्सी विसरा! आता बोटीने करा प्रवास, जलवाहतुकीचे नवीन मार्ग होणार खुले
इंडियन ऑईल कंपनीने अलीकडेच नोकर भरती जाहीर केली आहे. 12 सप्टेंबरला भरती जाहीर केली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख सप्टेंबर महिन्यात आहे. इंजिनिअर/ ऑफिसर (ग्रेड-A) (Chemical/ Electrical and Instrumentation) आणि ज्युनियर इंजिनिअर/ ऑफिसर (Chemical/ Mechanical/ Electrical/ Instrumentation) अशी पदभरती करण्यात येणार आहे. पद संख्या नमूद करण्यात आली नसून निवड प्रक्रिया दरम्यानच मर्यादित उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
advertisement
रेल्वे स्टेशनवर खराब खाद्यपदार्थांची विक्री; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड
अनुक्रमे पहिल्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत आहे. तर, दुसऱ्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत आहे. तर, वयोमर्यादा जास्तीत जास्त 26 वर्षे असून कमीत कमी 18 वर्षापर्यंत आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील उमेदवारांना 5 वर्षाची सूट असणार आहे. तर इतर मागासवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट असणार आहे. अनेक तरूणांसाठी प्रमुख मानल्या जाणाऱ्या भरतीचे नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही असू शकते.
6 लाखांची रोबोटिक शस्त्रक्रिया अगदी मोफत! जेजे रुग्णालयात यशस्वी प्रयोग
पहिल्या पदासाठी सामान्य उमेदवाराला 65% गुणांसह BE/ B.Tech पदवी हवी आहे. (Chemical/Electrical/Instrumentation) या विषयातील पदवीची गरज आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्तींना 55% गुणांची आवश्यकता आहे. तर दुसऱ्या पदासाठी सामान्य उमेदवाराला 65% गुणांसह इंजिनियरिंग डिप्लोमा पदवी हवी आहे. (Chemical/ Mechanical/ Electrical/ Instrumentation) या विषयातील पदवीची गरज आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्तींना 55% गुणांची आवश्यकता आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अपंग व्यक्तींना फॉर्म भरताना कोणतीही फी आकारली जाणार नाही. तर दोन्हीही पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना, इतर मागासवर्गातील उमेदवारांना आणि आर्थिक दुर्बल घटकां मोडल्या जाणाऱ्या उमेदवारांसाठी 400 ते 500 रूपया दरम्यानची फी आकारली जाईल. ऑनलाईन अर्जाप्रमाणे परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेची तारीख 31 ऑक्टोबर असून परीक्षेच्या काही दिवस आधी उमेदवारांना हॉलतिकिट मिळेल.