TRENDING:

NCP Ajit Pawar : वर्षभरातच अजितदादा झाले नकोसे? भाजप आमदारांच्या बैठकीची Inside Story

Last Updated:

लोकसभा निवडणुकीत कोकण वगळता महायुतीला फारसा प्रभाव पाडता आला नाही. या उलट महाविकासआघाडीने लोकसभेत घवघवीत यश मिळवलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसारखा नेत्याचं पाठबळ असतानाही भाजपचा ठिकठिकाणी पराभव झाला आहे, या पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तुषार रुपनवर, प्रतिनिधी
वर्षभरातच अजितदादा झाले नकोसे? भाजप आमदारांच्या बैठकीची Inside Story
वर्षभरातच अजितदादा झाले नकोसे? भाजप आमदारांच्या बैठकीची Inside Story
advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपचा मोठा पाडाव झाला आहे. 45 हून अधिक जागा जिंकण्याचं महायुतीचं स्वप्न महाविकासआघाडीने धुळीस मिळवलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला होता. पण यावेळी भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. 2019 च्या तुलनेत भाजपला 14 जागा गमवाव्या लागल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भाजपमधील बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि डॉ. भारती पवार या केंद्रीय मंत्र्यांना आपल्या गड राखता आला नाही.

advertisement

भाजपच्या आमदारांनी लोकसभेतील या पराभवाची चांगलीच धास्ती घेतली आहे, कारण लवकरचं विधानसभेच्या निवडणुकात होऊ घातल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची भीती भाजप आमदारांना सतावून लागली आहे. त्यामुळेचं विधानसभेत अजित पवारांची राष्ट्रवादी नको असा सूर भाजप आमदारांकडून आळवला जात आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना उमेदवाराला मदत होण्याऐवजी फटका बसल्याचा ठपका भाजप आमदारांनी ठेवलाय. सोलापूरमध्ये भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांना काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी 74 हजार मतांनी पराभूत केलंय. मोहोळ विधानसभा मतदार संघात अजित पवारांच्या पक्षाचे यशवंत माने हे आमदार असून इथून राम सातपुतेंना 63 हजार 152 मतं कमी मिळाली.

advertisement

माढा लोकसभा मतदार संघात भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर यांचा शरद पवारांच्या पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी 1 लाख 20 हजार मतांनी पराभव केला. या मतदार संघात

संजय शिंदे, बबनराव शिंदे, दिपक चव्हाण, रामराजे निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. संजय शिंदेंच्या मतदारसंघात रणजीतसिंह निंबाळकर 41,हजार 511 मतांनी पिछाडीवर होते. बबनराव शिंदे यांच्या विधानसभा मतदार संघात 52 हजार 515 मते कमी मिळीली. तर दिपक चव्हाण यांच्या मतदार संघात 16 हजार 918 मतांनी मागे पडले.

advertisement

नाशिकच्या दिंडोरी लोकसभेत भारती पवारांनी शरद पवारांच्या भास्कर भगरेंनी 1 लाख 13 हजार मतांनी पराभूत केलं,

कळवण-सुरगणा विधानसभेत अजित पवारांच्या पक्षाचे नितीन पवार आमदार असतानाही भाजप उमेदवार भारती पवार 57,683 मतांनी मागे पडल्या.

तसंच अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघात अजित पवारांच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. खेड विधानसभेत दिलीप मोहिते पाटील जुन्नरमध्ये अतुल बेनके, आंबेगावमध्ये दिलीप ळळसे पाटील तर हडपसरमध्ये चेतन तुपे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील पराभूत झाले आहे.

advertisement

लोकसभेतील ही सगळी आकडे पाहाता भाजप आमदारांना आता विधानसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सोबत नकोशी झाली आहे. खरं तर अजित पवार महायुतीत येवून उणे पुरे वर्षही लोटलं नाही, तोच भाजपला अजित पवारांची राष्ट्रवादी नकोशी झाली आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
NCP Ajit Pawar : वर्षभरातच अजितदादा झाले नकोसे? भाजप आमदारांच्या बैठकीची Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल