TRENDING:

वाहनात गॅस भरताना भीषण स्फोट, १० जण जागच्या जागीच...जळगावमध्ये काय घडलं?

Last Updated:

अमळनेर येथे जायला निघाल्यावर कारचालकाने दुपारी ४ वाजेच्या सुमारास ईच्छादेवी पोलिस चौकीपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या अवैध गैस रिफिलिंग सेंटरवर त्याने गॅस भरण्यासाठी कार थांबवली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नितीन नांदुरकर, जळगाव : जळगाव जिल्हयातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत ओमनी या चारचाकी गाडीत अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. इच्छादेवी पोलिस चौकीजवळ ही संपूर्ण घटना घडली आहे. या घटनेत १0  जण भाजले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, तर तिघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सूरू आहेत. या घटनेने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वाहनात गॅस भरताना भीषण स्फोट
वाहनात गॅस भरताना भीषण स्फोट
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,पुणे येथे राहणारे संजय गणेश वासवाला (वय ४५) हे पत्नी प्रतिभा व मुलगी रश्मी यांच्यासह जळगावातील साडू भरत दालवाला यांच्याकडे मंगळवारी सकाळी आले होते. संजय वासवाला यांचे भरत दालवाला यांच्या कुटुंबासह अमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात धार्मिक विधी करण्याचे नियोजन होते. यासाठी त्यांनी संदीप शेजवळ यांची ओमनी व्हॅन भाडेतत्वावर प्रवासासाठी ठरवली होती.

advertisement

ठरल्यानुसार अमळनेर येथे जायला निघाल्यावर कारचालकाने दुपारी ४ वाजेच्या सुमारास ईच्छादेवी पोलिस चौकीपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या अवैध गैस रिफिलिंग सेंटरवर त्याने गॅस भरण्यासाठी कार थांबवली होती. तिथे टाकीमध्ये गॅस भरताना टाकी फूटून मोठा स्फोट झाल्याची घटना घडली होती.या स्फोटामुळे ओमनीने देखील पेट घेतला होता. आणि नजीकच्या दुकानांना देखील आग लागली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

या स्फोटात तीन महिलांसह दहा जण भाजल्याची घटना घडली होती. यामध्ये व्हॅनचालकासह गॅस भरणारा आणि शेजारचा व्यावसायिक है देखील जखमी झाला होता. या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या पथकाने दोन बंब वापरून आग आटोक्यात आणली होती. या भीषण स्फोटात १० जण भाजले असून पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, त्यापैकी तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वाहनात गॅस भरताना भीषण स्फोट, १० जण जागच्या जागीच...जळगावमध्ये काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल