TRENDING:

मोठी बातमी! जळगावात नाकाबंदी दरम्यान साडेपाच कोटींचे सोने-चांदी जप्त !

Last Updated:

जळगावातील सुवर्ण व्यावसायिकासह अन्य दोन असे एकूण तीन सुवर्ण व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने पोलिसांच्या पथकाने पंचनामा करून हा साठा जप्त केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख बदोबस्त असून नाक्यानाक्यावर पोलिसांकडुन वाहनांची तपासणी सूरू आहे.अशाच एका तपासणीत पोलिसांनी 4 किलो सोने व 34 किलो चांदी जळगावमधून जप्त केली आहे. या सोन्या चांदीची किंमत 5 कोटी 59 लाख 61 हजाराच्या घरात आहे. शहरातील तीन ज्वेलर्स मालकांचे हे सोने चांदी असल्याची माहिती आहे. मात्र हे दागिने वाहून नेणाऱ्या चालकाकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. आता या सोने-चांदीच्या मालाची चौकशी होणार आहे.
पोलिसांची मोठी कारवाई
पोलिसांची मोठी कारवाई
advertisement

विधानसभा निवडणकीच्या अनुषंगाने सध्या तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या दरम्यान रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस नाकाबंदी करीत असताना पुणे येथून जळगावात येणाऱ्या वाहनातून चार किलो सोने व 34 किलो चांदी आढळली होती. या सोन्या चांदीची किंमत 5 कोटी 59 लाख 61 हजार आहे. रेमंड चौफुलीवर स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. जळगाव शहरातील सुवर्ण व्यावसायिकासह तीन सराफ व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याची माहिती आहे. पोलिसांनी हा सोन्या चांदीचा साठा जप्त करून कोषागार कार्यालयात पाठविला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

जळगावातील सुवर्ण व्यावसायिकासह अन्य दोन असे एकूण तीन सुवर्ण व्यावसायिकांचे हे सोने-चांदी असल्याचे सांगण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालाचे कागदपत्र वाहन चालकाकडे होते. मात्र त्यात इतर आवश्यक कागदपत्रे नसल्याने पोलिसांच्या पथकाने पंचनामा करून हा साठा जप्त केला. हे सोने पोलिसांनी ट्रेझरीमध्ये जमा केले असून आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या वतीने कागद पत्रांची पडताळली केली जात असल्याच पोलिस सुत्रांनी म्हटल आहे. तर सोने व्यावसायिकाने ही नियमित रित्या व्यवहारातील सोने असून त्याची कागदपत्र पोलिसांना देण्यात आली असल्याचं सोने व्यवसायीकांनी सांगितले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! जळगावात नाकाबंदी दरम्यान साडेपाच कोटींचे सोने-चांदी जप्त !
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल