या ब्लॉकमुळे केवळ स्थानिक मेमू गाड्याच नाही, तर अनेक एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले असून काही गाड्या दोन ते अडीच तास उशिराने धावत आहेत. अचानक गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, रेल्वे स्थानकावर गर्दी पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज रेल्वेने प्रवासाचा बेत आखला असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
advertisement
भुसावळ रेल्वे विभागातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि काहीशी गैरसोयीची बातमी समोर आली आहे. जलंब स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून अत्यावश्यक देखभालीचे आणि पायाभूत सुविधांच्या सुधारणेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी 'रेल्वे ब्लॉक' घेण्यात येणार असल्याने आज, शुक्रवारी ३० जानेवारी रोजी बडनेरा-नाशिक विशेष गाडीसह चार मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवासाचे नियोजन करण्यासाठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
आज प्रवासाला निघण्यापूर्वी या गाड्यांची यादी तपासून घ्या, कारण या गाड्या पूर्णपणे बंद राहतील: १. ६११०१ भुसावळ - बडनेरा मेमू २. ६११०२ बडनेरा - भुसावळ मेमू ३. १११२१ भुसावळ - वर्धा एक्स्प्रेस ४. १११२२ वर्धा - भुसावळ एक्स्प्रेस ५. ०१२११ बडनेरा - नाशिक रोड विशेष गाडी
'या' गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत किंवा त्या ठराविक काळ थांबवून ठेवल्या जातील
२०८२४ अजमेर - पुरी एक्स्प्रेस: ही गाडी सुमारे २.३० तास थांबवून (Regulated) चालवली जाईल.
२२७१० अंब अंदौरा - नांदेड एक्सप्रेस: २ तास उशिराने धावेल.
११०४० गोंदिया - कोल्हापूर एक्स्प्रेस: २ तास थांबवली जाणार आहे.
१२७५१ नांदेड - जम्मूतवी एक्स्प्रेस: १.३० तास उशिराने धावेल.
