TRENDING:

दाम्पत्य शेतात जाण्यासाठी निघालं, एसटीची जोरदार धडक, ६० फूट ओढत नेलं, महिलेचा मृत्यू

Last Updated:

Amalner Accident: दहिवद शिवारातील शेतात जाण्यासाठी मोटरसायकलवरून दाम्पत्य निघालं होतं. मात्र वाटेतच एसटीने बसने जोराची धडक दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव: अमळनेर तालुक्यातील गडखांब येथे एका भरधाव बसने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने लता मुरलीधर पाटील या महिलेला जीव गमवावा लागला असून त्यांचे पती मुरलीधर पाटील गंभीर जखमी झाले आहेत.
अमळनेर अपघात
अमळनेर अपघात
advertisement

ही दुर्दैवी घटना मुरलीधर पाटील व त्यांच्या पत्नी लता पाटील हे दहिवद शिवारातील शेतात जाण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना घडली. दरम्यान, चोपडा येथून अमळनेरकडे येणाऱ्या यावल आगाराच्या (एमएच २० बीएल २६५६) क्रमांकाच्या एसटी बसने त्यांना समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीसह दोघांनाही बसने जवळपास ५० ते ६० फूट ओढत नेले. या धडकेत लता पाटील गंभीर जखमी झाल्या. तातडीने त्यांना उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती मुरलीधर पाटील हे देखील गंभीर जखमी असून त्यांच्यावर अमळनेर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं धाडस दाखवलं, केली बोरांची शेती, वर्षाला 3 लाखांचं उत्पन्न
सर्व पहा

दरम्यान, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून प्रकरणाची सविस्तर चौकशी करू, असे पोलिसांनी सांगितले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दाम्पत्य शेतात जाण्यासाठी निघालं, एसटीची जोरदार धडक, ६० फूट ओढत नेलं, महिलेचा मृत्यू
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल