TRENDING:

Jalgaon : जळगावमध्ये उमेदवारावर प्राणघातक हल्ला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात केलं दाखल

Last Updated:

Jalgaon News : जळगाव-जामोदचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

जळगाव : स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत आज मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करीता पहाटे शेगाव कडे येण्यास निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू झाली. या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे

धारधार शस्त्रांनी त्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले असून याचवेळी प्रशांत डिक्कर यांना हृदविकाराचा तीव्र झटका येऊन ते अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

advertisement

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live: दादर आणि येवला मतदारसंघातील EVM मध्ये बिघाड

डिक्कर समर्थकांकडून हा हल्ला राजकिय विरोधक गुंडानी केला असल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी डिक्कर यांच्यासाठी ३ सभा १ रॅली घेतली होती. त्यावेळी उमेदवारासह संभाजीराजेंनी देखील याभागातिल दहशती विषयी चिंता व्यक्त केली होती. आज मतदानादिवशी हा हल्ला झाल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार प्रशांत डिक्कर यांना निवडणूक प्रक्रिया राबवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. या हेतुने हा हल्ला झाला असु शकतो.

advertisement

संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Afghan Apples: ‘पहलगाम’नंतर अफगाणी सफरचंद समुद्रमार्गे भारतात, पुण्यात दर किती?
सर्व पहा

एक विस्थापित भूमिहीन शेतमजुराचा मुलगा, शेतकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्ता प्रथापितांसमोर मोठे आव्हान उभे करतो आणि विजयाची वाट धरतो, हे माजलेल्या प्रस्थापित आमदाराला पाहवले नाही. लोकशाही पद्धतीने आपला पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या स्थानिक आमदाराने हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे. हा माज आम्ही उतरवू

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon : जळगावमध्ये उमेदवारावर प्राणघातक हल्ला, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात केलं दाखल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल