मांडळ येथील एका गर्भवती महिलेला सहाव्या महिन्यातच प्रसुती कळा लागल्या होत्या. परंतु रुग्णालयात रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती त्यामुळे खाजगी वाहनाने नेतांना महिला रस्त्यातच प्रसुती झाली आणि त्यात बाळ दगावले. याचाच संताप नातेवाईकांनी व्यक्त करण्यासाठी मांडळ ग्रामीण रुग्णालय गाठले. यावेळी महिला डॉक्टर आणि महेश बाळाच्या नातेवाईकांमध्ये वाद झाला. या वादातूनच महिला डॉक्टरने शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. डॉक्टरांनी वादात अतिशय अश्लाघ्य शब्दाचा वापर केला आहे.
advertisement
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भोयकर यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी गिरीश गोसावी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तर संबंधित महिला डॉक्टरला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती अमळनेर तालुका आरोग्य अधिकारी गोसावी यांनी दिली आहे.तर संबंधित महिला डॉक्टरने सर्व आरोप फेटाळून लावले असून उलटपक्षी त्यांनीच मला शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे.
