शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर असलेले ललित कोल्हे यांनी कारागृहातून निवडणूक लढवली होती.बोगस कॉल सेंटर प्रकरणांमध्ये ललित कोल्हे यांना अटक झाली होती आणि ते नाशिक कारागृहात आहेत. या दरम्यान ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी त्यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये ललित कोल्हे यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव पियुष कोल्हे हे देखील विजय झाले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये कोल्हे कुटुंबातील पिता पुत्राचा विजय झाला आहे.
advertisement
जळगाव अपडेट
एकुण जागा-75
भाजप- 22
शिवसेना- 15
राष्ट्रवादी-1
ठाकरे-00
काँग्रेस-00
मनसे-00
शरद पवार गट-00
एमआयएम - 00
इतर-
खान्देशातील सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १९ प्रभागांमध्ये मतदान घेण्यात आले होते. या मतदानानंतर आता मतमोजणी पार पडते आहे.
12 उमेदवार बिनविरोध विजयी
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचे ६ उमेदवार आहेत. गुरुवारी (१ जानेवारी) भाजपचा एक आणि शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या संख्येत वाढ झाली.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
भाजपकडून उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, विशाल भोळे, विरेन खडके, अंकिता पंकज पाटील आणि वैशाली अमित पाटील हे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.तर शिवसेना (शिंदे गट) कडून गौरव सोनवणे, सागर सोनवणे, गणेश सोनवणे, रेखा पाटील, मनोज चौधरी आणि प्रतिभा देशमुख हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष
या बिनविरोध विजयांमुळे महायुतीला निवडणुकीपूर्वीच मोठे बळ मिळाले आहे. मात्र उर्वरित प्रभागांमध्ये होणाऱ्या थेट लढतींमुळे निवडणुकीचे अंतिम चित्र काय असेल, याबाबत उत्सुकता कायम आहे. जळगाव महानगरपालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार, महायुती आपले वर्चस्व कायम ठेवणार की विरोधक धक्का देणार, याकडे आता संपूर्ण खान्देशाचे लक्ष लागले आहे.
महायुतीची जागावाटपाची रणनीती
जळगावमध्ये महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत भाजपला ४६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ६ जागा, तर शिवसेना (शिंदे गट) यांना २३ जागा देण्यात आल्या आहेत. मात्र या जागावाटपात काही प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात उमेदवारांची आयात-निर्यात झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, ती दूर करण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
