सिक्स सीटर प्रवासी रिक्षा अमोदा येथून फैजपूरकडे येत होती. तर मालवाहू रिक्षा फैजपूरकडून अमोदा दिशेने जात होती. दोन्ही रिक्षांची समोरासमोर जोरदार धडक झाली. प्रवासी रिक्षा (क्रमांक MH 19 CW 3590) आणि मालवाहू रिक्षा (क्रमांक MH 19 7064) यामध्ये हा अपघात झाला.
या अपघातात सावदा येथील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. सोपान खडसे यांची कन्या आदिती सोपान खडसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त इतर प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना तातडीने फैजपूर पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे स्थानिक रुग्णालयात हलवले आहे.
advertisement
दरम्यान, घटनास्थळी फैजपूर पोलीस दाखल झाले असून अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास फैजपूर पोलीस करीत आहेत. अदिती सोपान खडसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
May 04, 2025 4:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident: वाहनांची समोरासमोर धडक, अपघातात प्रसिद्ध डॉक्टरांच्या लेकीचा मृत्यू
