TRENDING:

जळगावात खळबळ! पहाटे उमेदवाराच्या घरावर गोळीबार, CCTV फूटेजचा तपास सुरू

Last Updated:

Jalgaon News : अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. मेहरुण परिसरात शेरा चौकात शेख यांचं घर असून या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जळगावमध्ये गोळीबाराची घटना घडलीय. अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला. मेहरुण परिसरात शेरा चौकात शेख यांचं घर असून या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली होती.
News18
News18
advertisement

अहमद हुसेन यांचे समर्थक तसेच समाजातील प्रतिष्ठीत नागरिक देखील घटनास्थळी हजर झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. गोळीबार करणाऱ्यांचा शोध घेतला जात असून अपक्ष उमेदवाराला पोलीस संरक्षण मिळणार असल्याचंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

जळगाव जिल्ह्यात याआधीही मुक्ताईनगर बोदवडमधून निवडणूक लढणारे उमेदवार विनोद सोनवणे यांच्या वाहनावरही गोळीबारची घटना घडली होती. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. गोळीबारामुळे काचा फुटल्या, त्याचा आवाज झाल्यानंतर अहमद हुसेन यांचे कुटुंब जागे झाले. तीन राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

advertisement

अहमद हुसेन यांनी गोळीबाराच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, प्रचारामुळे थकल्यामुळे लवकर झोपलो होती. मी जळगावच्या विकासावर निवडणूक लढत आहे. काही भ्याड लोकांनी हा हल्ला केला. मी कुणालाही घाबरणार नाही. माझा प्रचार सुरूच ठेवणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

गोळीबाराच्या घटनेची माहिती होताच निवडणूक विभागाचे सामान्य निरीक्षक, सामान्य पोलीस निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.  सीसीटीव्ही फुटेजचा आढावा घेतला जात असून पहाटे ३:४२ वाजता त्याच्या घराजवळ एक मोटारसायकल आढळून आली. त्या संदर्भातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगावात खळबळ! पहाटे उमेदवाराच्या घरावर गोळीबार, CCTV फूटेजचा तपास सुरू
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल