जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ला आणखी दोन बिनविरोध जागा मिळाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 9 ब मधून विक्रम सोनवणे तर प्रभाग क्रमांक 9 अ मधून रेखा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आणि एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे दोन उमेदवार बिनविरोध ठरले आहे.त्यामुळे आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या एकूण सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.या यशानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या बाहेर जोरदार जल्लोष साजरा केला.
advertisement
एकनाथ शिंदेंसोबत आज जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाला आणखी एक बिनविरोध जागा मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपाचे आतापर्यंत एकूण सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या यशानंतर महापालिकेच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष साजरा केला आहे.
दरम्यान वेळ संपल्यामुळे काही उमेदवारांना माघार घेता आली नाही, मात्र उद्या साधारण वीस उमेदवार महायुतीला समर्थन देतील, अशी माहिती भाजपाचे निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. जळगावकरांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला असून 75 पैकी किमान 70 जागांवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वासही आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान आता जळगाव महापालिकेत आता 19 वॉर्डमधून 75 जागांवर निवडणूक पार पडते आहे.या निवडणुकीत भाजप 46 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 25 तर अजित पवार यांची राष्ट्रवादी चार जागा लढते आहे. तर या निवडणुकीत बहुमताचा आकडा 38 आहे. सध्या निवडणुकीआधीच महायुतीने 12 जागा निवडुन आणल्या आहेत.त्यामुळे आता महायुतीला बहुमतासाठी फक्त 26 जागा जिंकायच्या आहेत.या जागा महायुती सहज जिंकेल असा अंदाज आहे.
जळगावमधील बिनविरोध उमेदवार
भाजप
उज्वला बेंडाळे (प्रभाग क्र. 12 ब
विशाल भोळे (प्रभाग क्र.7 क )
विरेंद्र खडके (प्रभाग क्र.16 अ)
दीपमाला काळे (प्रभाग क्र.7 अ)
वैशाली पाटील (प्रभाग क्र.13 क)
अंकिता पाटील (प्रभाग क्र.7 ब )
शिवसेना (शिंदे गट)
गौरव सोनवणे (प्रभाग क्र. 18 अ)
मनोज चौधरी (प्रभाग क्र.9 अ)
प्रतिभा देशमुख (प्रभाग क्र.9 ब)
सागर सोनवणे (प्रभाग क्र.2 अ)
विक्रम सोनवणे (प्रभाग क्र. 19 ब)
रेखा पाटील (प्रभाग क्र. 19 अ)
