TRENDING:

Jalgaon Election Result : जळगावात महायुती सुस्साट, मविआचा सुपडासाफ, किती जागा जिंकल्या?

Last Updated:

जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीची गाडी सुस्साट पळाली आहे. कारण जळगाव महापालिका निवडणुकीतील 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Jalgaon Municipal Election Result : जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीची गाडी सुस्साट पळाली आहे. कारण जळगाव महापालिका निवडणुकीतील 75 पैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीची सुपडासाफ झाला आहे.
jalgaon municipal election result
jalgaon municipal election result
advertisement

जळगाव महापालिका निवडणुकीत 75 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. यापैकी 69 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप 46, शिवसेना 22 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा 1 विजयी झाला आहे.तसेच प्रभाग क्रमांक 17 मधील ठाकरे गटाचे चारही उमेदवार तर प्रभाग सहा मधील 1 असे शिवसेना ठाकरे गटाचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत आणि एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजयी झाला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेवर 69 जागांसह महायुतीचा झेंडा फडकवला आहे.

advertisement

तुमच्या प्रभागातील नगरसेवक, जळगाव महानगरपालिकेतील विजयी उमेदवारांची यादी

या निवडणुकी भाजपने 46 जागा लढवल्या होत्या. या 46 पैकी 46 जागा भाजपने जिंकून आणल्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 23 जागा लढवल्या त्यापैकी 22 जागांवर विजय मिळवण्यात त्यांना यश आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी ६ जागा लढवल्या होत्या,त्यापैकी एकच जागा त्यांना जिंकता आली आहे.

advertisement

खान्देशातील सर्वात मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १९ प्रभागांमध्ये मतदान घेण्यात आले होते.

12 उमेदवार बिनविरोध विजयी

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे एकूण १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यामध्ये भाजपचे ६ आणि शिंदेसेनेचे ६ उमेदवार आहेत. गुरुवारी (१ जानेवारी) भाजपचा एक आणि शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या संख्येत वाढ झाली.

advertisement

बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

भाजपकडून उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, विशाल भोळे, विरेन खडके, अंकिता पंकज पाटील आणि वैशाली अमित पाटील हे सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.तर शिवसेना (शिंदे गट) कडून गौरव सोनवणे, सागर सोनवणे, गणेश सोनवणे, रेखा पाटील, मनोज चौधरी आणि प्रतिभा देशमुख हे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

advertisement

पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष

या बिनविरोध विजयांमुळे महायुतीला निवडणुकीपूर्वीच मोठे बळ मिळाले आहे. मात्र उर्वरित प्रभागांमध्ये होणाऱ्या थेट लढतींमुळे निवडणुकीचे अंतिम चित्र काय असेल, याबाबत उत्सुकता कायम आहे. जळगाव महानगरपालिकेतील सत्ता कोणाच्या हाती जाणार, महायुती आपले वर्चस्व कायम ठेवणार की विरोधक धक्का देणार, याकडे आता संपूर्ण खान्देशाचे लक्ष लागले आहे.

महायुतीची जागावाटपाची रणनीती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जेवणाची वाढेल गोडी, पारंपरिक कारळ्याची बनवा चटणी, सोप्या रेसिपीचा Video
सर्व पहा

जळगावमध्ये महायुतीची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या अंतर्गत भाजपला ४६ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना ६ जागा, तर शिवसेना (शिंदे गट) यांना २३ जागा देण्यात आल्या आहेत. मात्र या जागावाटपात काही प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदेसेना यांच्यात उमेदवारांची आयात-निर्यात झाल्याचे चित्र दिसून आले. यामुळे काही ठिकाणी भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर उमटले असून, ती दूर करण्यासाठी पक्षनेतृत्वाकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Election Result : जळगावात महायुती सुस्साट, मविआचा सुपडासाफ, किती जागा जिंकल्या?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल