Jalgaon News : विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत दसऱ्याच्या दिवशी देवी विसर्जनासाठी गेलेल्या एका तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हितेश संतोष पाटील (वय 19, रा. दादावाडी) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना बांभोरी गावाजवळ सुरत रेल्वे पुलानजीक घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या दिवशी गिरणा नदीपात्रात देवींचे विसर्जन सूरू होते. या विसर्जनासाठी हितेश पाटील आपल्या मित्रांसह नदीत गेला होता.यावेळी देवीचे विसर्जन केल्यानंतर हितेशचा तोल गेला आणि तो जाऊन पाण्यात बुडाला. या दरम्यान
मित्रांनी आरडाओरड करत त्याच्या मदतीचा प्रयत्न केला. पण कुणाची मदत मिळू शकली नाही आणि हितेश तोपर्यंत वाहून गेला होता.ही घटना बांभोरी गावाजवळ सुरत रेल्वे पुलानजीक घडली.
या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमन दलासह महसूल विभाग, तालुका पोलीस ठाणे, वन्यजीव संरक्षण संस्था यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी रात्री उशिरापर्यंत बचावपथकाने हितेशचा शोध घेतला. पण पण त्यांना हितेश काय सापडला नव्हता.त्यानंतर बचावकार्य थांबवत पुन्हा सकाळी सूरूवात करण्यात आली होती.पण अद्याप मृतदेह सापडला नाही आहे.
दरम्यान या घटनेने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.