जळगाव जिल्ह्यात गुरुवारी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठी दत्तात्रय पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा पाय तोडण्यात आला. सुदैवाने काहींनी वेळीच मध्यस्थी केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. वाळू माफिया हे वाळूची सर्रासपणे चोरी करतात. यावरुन वाळू माफियांना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचं दिसून येत आहे.
advertisement
वाळू माफियांना कायद्याचा धाक नाही
मागील वर्ष भरात ही थेट निवासी जिल्हाधिकारी सोमनाथ कासार यांच्यवर ही असाच प्राणघातक हल्ला करून त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसाच प्रयत्न तहसीलदारांच्या महिला पथकाच्यावर ही मागील महिन्यातली घटना ताजी आहे. अशा घटना वारंवार या घटना घडत असल्याने,महसूल कर्मचारी यांच्यामधे मोठी भीती पसरली आहे. अवैध रेती वाहतूक विरोधात प्रशासनाने मोठी मोहीम राबविली असल्याने अवैध रेती वाहतूक करणाऱ्यामध्ये मोठी भीती निर्माण झाली होती. मात्र, या कारवाया रोखल्या जाव्यात, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये कारवाया करताना भीती निर्माण व्हावी, अशाच उद्देशाने असे जीवघेणं हल्ले केले जात असल्याचं मानले जात आहे.
दहा कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई
गेल्या वर्षभरात प्रशासनाने कारवाई करताना एकूण आठ हजार कारवाया केल्या आहेत. तर आठशे हून अधिक वाहने जप्त केले असून,दहा कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 80 लोकांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच काहींवर एमपीडीए कायद्याने कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
