मुक्ताईनगर पोलिसांनी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माणगावमधल्या शिवारात छापा टाकला, तेव्हा त्यांना केळी बागेच्या आडोश्याला गांजाची शेती मोठ्या प्रमाणावर केली गेल्याचं समजलं. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गांजाचं पीक नष्ट केलं आहे. तसंच याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
केळी बागेच्या दाट फांद्यांच्या आत नियोजनबद्ध पद्धतीने गांजाची शेती सुरू होती. फांद्यांच्या आतमध्ये काय सुरू आहे, हे ये जा करणाऱ्या कुणालाही कळत नव्हतं, पण आतामध्ये गांजाची झाडे पूर्णपणे वाढलेली होती. गांजाच्या या पीकाचा बाजारभाव लाखोंच्या घरात असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी गांजाची शेती नष्ट केली, तसंच तपास आणि पुरावा म्हणून गांजाच्या झाडाचे नमुने जप्त केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे हे ऑपरेशन पार पाडलं.
advertisement
