ही बातमी गावात पसरताच, संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन सुरू केले. प्रियरंजनदास यांच्या निधनामुळे ग्रामस्थ शोकाकुल आणि आक्रोशित झाले. त्यांनी या महामार्गावर वारंवार अपघात घडत असूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
या आंदोलनादरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडे समांतर रस्ता आणि उड्डाणपूल तातडीने बांधण्याची मागणी केली. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
advertisement
या अपघाताची माहिती मिळताच, एरंडोलचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा केली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर जवळपास एक तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. या अपघातामुळे पिंपळकोठा परिसरात सध्या शोककळा पसरली असून, प्रियरंजनदास यांच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.