घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लहान मुले पकडणारी टोळी असल्याच्या संशयावरून झालेल्या मारहाणीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आली आहे. मारहाण होत असताना पारोळा पोलिसांचे पथक वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला. ही थरारक घटना पारोळा तालुक्यातील लोणी येथे गुरुवारी रात्री घडली. जखमी चारही तरुण जळगावचे आहेत. नरेंद्र सुनील जाधव, नसिरुद्दीन शहाबुद्दीन शेख, शेख मो. अनास मो. अब्दुल्ला,आणि तेजाज एजाज शेख अशी जखमींची नावे आहेत.
advertisement
हे चारही जण कासोदा येथे गुरुवारी रात्री आले होते. मात्र तेथील काही लोकांना या तरुणांच्या वेशभूषेमुळे संशय आला. त्यांनी या तरुणांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कारमध्ये बसून पसार झाले. त्यामुळे त्यांच्याबद्दल संशय बळावला. यामुळचे नागरिकांनी पुढे कार अडवून त्या चौघांना चोप दिला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांविरोधात पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 14 जणांना अटक करण्यात आली आहे.
