घटनेत जखमी झालेल्या 14 लोकांवर चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 8 गंभीर मजुरांना धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. नांदगाव रस्त्यावर हिरापूर रेल्वे स्टेशनजवळ ही घडली आहे. होळीसाठी गावी जाण्याकरत हे मजूर डंपरने भुसावळ येथे जात होते. तिथून ते रेल्वेने आपल्या गावी जाणार होते.
advertisement
हिरापूरजवळ तिसऱ्या रेल्वे लाईनचं काम सुरू आहे. या ठिकाणी मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील मजूर काम करत होते. तिसऱ्या रेल्वे लाइनचं काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा हिशोब झाल्यावर हे मजूर त्यांच्या गावी निघाले होते. ते भुसावळ येथून कटनी पॅसेंजरने गावी जाण्यासाठी डंपरने रेल्वे स्टेशनकडे निघाले होते. मात्र, ते घरीच पोहोचलेच नाहीत. रस्त्यातच झालेल्या अपघातात दोघींचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
नांदेड, हिंगोली आणि परभणीत भूकंप -
दरम्यान दुसरीकडे, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आज सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड शहरासह हदगाव, नायगाव , अर्धापूर तालुक्यात काही ठिकाणी धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांपासून ते 6 वाजून 15 मिनिटांपर्यंत हे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोली तालुक्यासह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यात काही ठिकाणी सकाळी दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. परभणी जिल्ह्यातही सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 4.2 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले आहेत.
