घटनेबाबत अधिक माहिती अशी की, 65 लाख रुपये लंपास करणाऱ्या तीन जणांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयीतांकडून सुमारे 20 लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. तीनही संशयित नाशिक येथील सिक्यूर व्हॅल्यू इंडिया लिमिटेड या खासगी कंपनी मार्फत एटीएम मशीनमध्ये रक्कम भरण्याचं काम करतात. मात्र पैसे भरत असताना त्यांनी तब्बल 65 लाख रुपये लांबवल्याचं उघड झालं आहे.
advertisement
या प्रकरणी आरोपींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत या तीनही जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Jan 01, 2024 8:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
धक्कादायक! एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आले अन् 65 लाख लांबवले, जळगावात खळबळ
