उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. महाविकास आघाडीचे दोनशेहून अधिक पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच यांचा समावेश आहे. 15 गाड्यांचा ताफा जळगाहून मुंबईकडे रवाना झाला आहे.
देवगिरी बंगल्यावर सायंकाळी सहा वाजता अजित पवार यांच्या हस्ते सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. रावेर मतदार संघ हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तब्बल दोनशे पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील हा प्रवेश सोहळा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला देखील या लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.
advertisement
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
January 10, 2024 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
मोठी बातमी! निकालापूर्वीच उद्धव ठाकरे, शरद पवारांना मोठा धक्का; 200 प्रमुख पदाधिकारी सोडणार साथ, अजित पवार गटात प्रवेश
