Business Success: काळेवाडीच्या महिलांची भरारी! घरात बसून कमावले तब्बल 17 लाख, दिवाळीत असं काय केलं?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Business Success: पुण्यातील काळेवाडीच्या भरारी महिला संस्थेने महिलांच्या स्वप्नांना बळ दिलंय. यंदा दिवाळीत संस्थेच्या माध्यमातून महिलांनी 17 लाखांची कमाई केली.
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथील भरारी महिला संस्था गेल्या 14 वर्षांपासून स्थानिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचं काम करत आहे. संस्थेच्या माध्यमातून महिलांना घरी बसून किंवा संस्थेच्या ठिकाणी कामाची संधी दिली जाते. विशेष म्हणजे, संस्थेत दिव्यांग, निराधार आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांनाही रोजगार दिला जातो. याच संस्थेच्या प्रवासाबद्दल संस्थेच्या संस्थापिका आशा इंगळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना माहिती दिली आहे.
संस्थेच्या संस्थापिका आशा इंगळे यांनी सांगितलं की, यावर्षी दिवाळीत महिलांनी स्वतःच्या हातांनी आकर्षक आकाशकंदील तयार केले होते, ज्यांची विक्री राज्यभर करण्यात आली. आशा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी सुमारे 60 ते 70 प्रकारचे आकाशकंदील बनवले होते. या कंदिलांची किंमत 20 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत होती.
advertisement
यंदा निवडणुका जवळ आल्याने अनेक राजकीय पक्षांकडून ऑर्डर्स मिळाल्या आणि त्यामुळे विक्रीत मोठी वाढ झाली. या उपक्रमातून महिलांनी तब्बल 17 ते 18 लाखांची कमाई केली आहे. संस्थेमार्फत महिलांना फक्त दिवाळीतच नव्हे तर वर्षभर रोजगाराची संधी मिळते. लग्नातील रुकवत, घरगुती वापराच्या वस्तू, सजावटीचे सामान अशा विविध वस्तूही या महिला तयार करतात.
advertisement
आशा इंगळे सांगतात की, भरारी महिला संस्थेचा उद्देश महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ देत त्यांना आत्मनिर्भर बनवणं आहे. काळेवाडी परिसरातील या संस्थेने गेल्या काही वर्षांत शेकडो महिलांना रोजगार दिला असून, त्यांच्या हातून तयार झालेल्या वस्तूंना संपूर्ण महाराष्ट्रभरातून मागणी आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळत असून त्या आत्मनिर्भर बनत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 01, 2025 12:50 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Success: काळेवाडीच्या महिलांची भरारी! घरात बसून कमावले तब्बल 17 लाख, दिवाळीत असं काय केलं?









