याबाबत मिळालेली माहिती अशी की, धरणगावमधून गरोदर महिलेला रुग्णालयात नेत असताना गाडीत आगीची ठिणगी उडाली. तेव्हा चालक राहुल बाविस्कर याला शंका आल्यानं त्यानं गाडी बाजूला घेतली आणि रुग्ण महिलेसह सर्वांना खाली उतरवलं. रुग्णांना दुसऱ्या एम्बुलन्समधून पुढे पाठवण्यात आलं. दरम्यान, थोड्या वेळातच एम्बुलन्सचा स्फोट झाला.
एम्बुलन्सचा स्फोट इतका भीषण होता की वाहनाच्या चिंधड्या उडाल्या. आगीचे लोट हवेत पसरले. तर पार्टस उडून बाजूला पडले होते. बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. आग लागल्यानंतर स्फोट झाला. यावेळी रस्त्यावर ही घटना पाहणाऱ्यांमध्येही गोंधळ उडाला. काहींनी या घटनेची दृश्ये शूट केली आहेत. तर या घटनेनंतर काही काळ महामार्ग बंद झाला होता.
advertisement
स्फोटात चिंधड्या झालेली एम्ब्युलन्स केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या ताफ्यात होती. दुपारी अमित शहा जळगाव दौऱ्यावर होते तेव्हा त्यांच्या ताफ्यात ही गाडी होती. एक सिलिंडर ऑक्सिजनने भरलं होतं तर दुसरं रिकामं होतं. भरलेल्या सिलिंडरचे स्फोटामुळे तुकडे झाल्याचं दिसून आलं.
