काय म्हणाले बच्चू कडू?
प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. राज्यात निराशाजनक परिस्थिती आहे. कष्टकऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाहीत. मतासाठी चुकीच्या घोषणा केल्या जात आहेत, असं म्हणत राज्य आणि केंद्र सरकारवर बच्चू कडू यांनी घणाघाती टीका केली. साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. लखपती दीदी ह्या तुम्ही घोषणा करताय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. लखपती दीदीचं गाजर तुम्ही देऊ नका. लुटता किती हे आधी पाहा, असंही बच्चू कडू म्हणाले. तर येत्या विधानसभेत महायुतीला पाठिंबा द्यायचा की? महाविकास आघाडीला? हे एक सप्टेंबर रोजी प्रहार ठरवणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात प्रहार विधानसभेची जाग लढवणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.
advertisement
