२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीला भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी साडेचार लाख मताधिक्क्याने विजय मिळवला होता. तेव्हा भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी उमेदवारी रद्द करत उन्मेष पाटील यांना संधी दिली होती. आता २०२४ च्या लोकसभेसाठी त्यांची दावेदारी भक्कम मानली जात असताना भाजपने तिकीट कापल्याने नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाची वाट धरली.
advertisement
बदला घेणारं राजकारण वेदनादायी होतं. आपण या पापाचे वाटेकरी होता कमा नये. खासदार, आमदार पद महत्त्वाचं नाही पण स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने लढण्याचं ठरवलं असल्याचं उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेशावेळी म्हटलं.
खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मेलच्या माध्यमातून उन्मेष पाटील यांनी पाठवला त्यांचा लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा पाठवला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावाने पत्र लिहून राजीनामा सूपूर्द केला. मी माझ्या जळगाव लोकसभा सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत असून तो स्वीकार करावा असं उन्मेष पाटील यांनी राजीनामात म्हटलं आहे.
उन्मेष पाटील यांच्या कार्यालयातले भाजपचे चिन्ह हटवले
भाजप खासदार उन्मेश पाटील यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयावरील भाजप पक्षाचे कमळाचे चिन्ह काढण्यात आले. उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी आज सकाळी त्यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयावरील कमळ चिन्ह हटवण्यात आले. संपर्क कार्यालयाच्या नावाच्या फलकावर दोन्ही बाजूस असलेले कमळ चिन्हाचे लोगो काढून टाकण्यात आले. संपर्क कार्यालयाच्या आतील बाजूस असलेले कमळ चिन्ह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो सुद्धा हटविण्यात आले.
